या एका अटीवर अभिनेत्री करिना कपूरने केले सैफ अली खानसोबत लग्न !

Ahmednagarlive24
Published:

मुंबई :  अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या नात्यावरून असं स्पष्ट होत की प्रेमाला कसलीचं बंधन नसतात. हवा असतो तो म्हणजे फक्त विश्वास.

टशन’ चित्रपटामध्ये या दोन प्रेमी युगूलांनी एकत्र काम केलं. चित्रपट तर चाहत्यांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला. पण याच चित्रपटाच्या सेटवर त्यांचे नाते मात्र बहरण्यास सुरूवात झाली.

या नात्याचे रूपांतर विवाह बंधनात झाले. पण सैफसोबत विवाह बंधनात अडकण्यापूर्वी करिनाने सैफपुढे एक मोठी अट घातली होती,

‘मी तुमची पत्नी आहे आणि मी शेवटपर्यंत बॉलिवूडमध्ये काम करत राहील आणि त्यास सैफ ने पाठिंबा द्यावा ही एका अट करीनाने सैफसमोर ठेवली होती.

त्यानंतर, सैफने ती अटी मान्य देखील केली आणि  अखेर १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफ-करिना विवाह बंधनात अडकले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment