Adani Group : स्वित्झर्लंडस्थित (Switzerland) होल्सीम ग्रुपच्या (Holcim Group) अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) आणि एसीसी (ACC) या दोन भारतीय कंपन्यांमधील 26 टक्के भागभांडवल खरेदीसाठी अदानी ग्रुपची (Adani Group) 31,000 कोटी रुपयांची खुली ऑफर शुक्रवारी पूर्ण झाली.या ऑफरला शेअर्सधारकांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
कंपनीने काय म्हटले?

एसीसी लिमिटेडने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, 4.89 कोटी रुपयांच्या मूळ ऑफरसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत फक्त 40.51 लाख इक्विटी शेअर्सनाच बोली मिळाली, जी फक्त 8.28 टक्के आहे.
त्याचप्रमाणे अंबुजा सिमेंटच्या केवळ 1.35 टक्के शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली. दुपारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अंबुजा सिमेंटच्या 51.63 कोटी शेअर्सच्या मूळ ऑफरच्या तुलनेत केवळ 6.97 लाख शेअर्ससाठीच बोली प्राप्त झाली.
दोन्ही कंपन्यांसाठी ऑफर 26 ऑगस्ट 2022 रोजी खुली होती. अदानी ग्रुपने मे महिन्यात अंबुजा सिमेंटसाठी 385 रुपये प्रति शेअर आणि एसीसी लिमिटेडसाठी 2,300 रुपये प्रति शेअरची खुली ऑफर दिली होती.