Maharashtra news :शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतर यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बंडखोरांकडून टीका केली जात आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता योजना आखली आहे.
युवा नेते आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले असून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे सामानातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी कार्यकारी संपादक संजय राऊत त्यांची मुलाखत घेणार आहेत.

स्वत: राऊत यांनी आज ही योजना सांगितली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर राऊत हे ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. त्यामध्ये ठाकरे टोकदार उत्तरे देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. ही मुलाखत सामनामध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.
तसेच ती विविध वृत्तवाहिन्यांवरूनही प्रसारित करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितेल. राऊत यांनी यापूर्वीही ठाकरे यांच्या अशा मुलाखती घेतल्या आहेत. आता बदलत्या राजकीय परिस्थिती ही मुलाखत कशी होते? याकडे लक्ष लागले आहे.