Maharashtra Politics : शिवसेनेत उरलेल्या निष्ठावान शिवसैनिकांशी संपर्क साधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रा’ सुरू केली आहे. बुधवारी ‘निष्ठा यात्रा’ मुंबईतील वडाळ्यात परिसरात असताना जोरदार पाऊस सुरू झाला. भर पावसात ठाकरे यांनी भाषण केले.
त्यांच्या या पावसातील सभेची आता सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे यांच्या पावसातील सभेची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती.
या सभेतनंतर राज्यातील राजकारण बदलून गेले होते. तेव्हापासून कोणीही नेत्याने पावसात भाषण केले तर तो चर्चेचा विषय ठरतो. त्यानुसार आता आदित्य ठाकरे यांचीही पावसातील सभा चर्चेत आहेत. तसेच याचा त्यांना खरेच फायदा होऊ शकतो का? याचीही चर्चा सुरू आहे.
या सभेत ठाकरे यांचे आक्रमक भाषण झाले. ठाकरे वारंवार बंडखोरांना ‘गद्दार’ म्हणून डिवचत आहेत. कालच्या सभेतही त्यांनी पुन्हा हा शब्द वापरला. अशा घाणेरड्या राजकारणामुळे तरुण मंडळी या क्षेत्राकडे वाईट दृष्टीने पहात असल्याचेही ते म्हणाले.