Maharashtra News:विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाचे आमदार दररोज पायऱ्यांवर आंदोलन करीत आहेत. कालपासून सत्ताधारी गटातील आमदारांनीही तेथे आंदोलन व घोषणाबाजी करण्यास सुरवात केली आहे.
काल त्यावर राडाही झाला. आज पुन्हा सत्ताधारी गटाचे आमदार पायऱ्यांवर बसले आहेत. आज त्यांनी सोबत आणलेला फलक लक्षवेधून घेत आहे.

त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट गेले आहे. गाढवावर उलटे बसलेल्या ठाकरे यांचे छायाचित्र त्यावर लावण्यात आले असून महाराष्ट्रातील परम पूज्य (प पू.) असा उल्लेख त्यावर केला आहे.
आदित्य ठाकरे यांची हिंदुत्वाची दिशा चुकली हे सूचित करण्यासाठी त्यांना गाढवावर उलच्या दिशेने बसल्याचे दाखविण्यात आले आहे.
एका बाजूला हिंदुत्व आणि दुसरीकडे महाविकास आघाडी असे लिहून ठाकरे उलट्या दिशेने महाविकास आघाडीकडे जाण्यासाठी निघाल्याचे चित्रातून दाखविण्या आले आहे.
याशिवाय ठाकरे यांच्या विषयी केले जाणारे अनेक आरोप या फलकावर लिहिण्यात आले आहेत.