आदित्यनंतर आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर, हटके सुरवात

Published on -

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहेत.

आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरवात मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यापासून होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र मोहिम जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ‘महाप्रबोधन यात्रा’ सुरु होणार आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर पहिली सभा होणार आहे. हा भाग शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची यात्रा जाणार आहे. यात्रेची सांगता कोल्हापुराच्या बिंदू चौकात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!