Salman Khan : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) फॅन फॉलोइंगचा अंदाज लावणंही कठीण आहे. फॅन फॉलोइंगमुळे त्यांचे चित्रपट शेकडो कोटींची कमाई करतात.
त्यांच्या चाहत्यांची संख्या देशातच नाही तर देशाबाहेरही आहे. पण, अलीकडेच काही बातम्या समोर आल्या, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या (death threats) आल्याचे सांगण्यात आले.
अशा बातम्यांनंतर काही दिवसांनी आता सलमान खानने नवी बुलेट प्रूफ कार खरेदी (new bullet proof car) केली आहे. रिपोर्टनुसार, त्याने जी कार खरेदी केली आहे ती टोयोटा लँड क्रूझर (Toyota Land Cruiser) आहे. त्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे.
ही बुलेटप्रूफ एसयूव्ही असल्याचेही बोलले जात आहे. तथापि, विशेष म्हणजे, Toyota अधिकृतपणे मर्सिडीज-बेंझ, BMW आणि Audi सारख्या बर्याच जर्मन कार निर्मात्यांप्रमाणे बुलेटप्रूफ वाहने विकत नाही. टोयोटा लँड क्रूझर सारख्या कारमध्ये आफ्टरमार्केट आर्मरिंग केले जाते.
जगभरात अनेक नामांकित आर्मरिंग गॅरेज आहेत. महिंद्रा आर्मर्ड व्हेइकल्स देखील ग्राहकाच्या गरजेनुसार आफ्टर मार्केट आर्मरिंग सेवा देतात. अशा आफ्टरमार्केट सेवेमध्ये आर्मरिंगचे अनेक स्तर उपलब्ध आहेत. OEM आर्मर्ड वाहन VR8 आणि VR9 सारख्या फॅक्टरी-रेट केलेल्या सुरक्षा स्तरांसह येते.
मात्र, वाहन बुलेटप्रूफ आहे की नाही हे पाहणाऱ्यांना माहिती नसते. परंतु, जर तुम्ही वाहनाच्या खिडक्यांकडे बारकाईने पाहिल्यास, जाड किनारी त्या सीलबंद आणि बुलेटप्रूफ असल्याचे प्रकट करू शकतात. सोमवारी संध्याकाळी सलमान आणि त्याची सुरक्षा टीम मुंबई विमानतळावर बुलेटप्रूफ लँड क्रूझरसह दिसली.
त्याचे व्हिडिओ अनेक पापाराझी अकाऊंटद्वारे शेअर केले गेले आहेत, व्हिडिओमध्ये सलमान खान नवीन लँड क्रूझरमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्यासोबत काही सुरक्षा कर्मचारीही होते. याआधी सलमान खानने गेल्या महिन्यात बंदुकीचा परवानाही घेतला होता.