Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील तरुणाची कमाल ! सायकलवरून पूर्ण केला आयोध्या-प्रयागराज-काशी विश्वनाथ असा १५५० किमी प्रवास, तेही १४ दिवसांत

Published on -

एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे या तरुणाने पुन्हा आणून दिलाय. या तरुणाने १४ दिवसांत तब्बल १५५० किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. आयोध्या-प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण असा १५५० कि.मी. प्रवास सायकल वर त्यांनी पूर्ण केला. त्यांचा या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नातेवाईक, मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे. भामाठामचे अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी ठरवलं की आपण सायकल प्रवास करायचा तो ही एकट्यानेच. दररोज शंभर किमी पेक्षा जास्त सायकल चालवली.

सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सायकल चालवत, दररोज १०० किमी पेक्षा जास्त अंतर कापत जवळपास १५५० किलोमीटर सायकल चालवण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागला. आपल्या प्रवासात अडचणी, वेदना सहन करत, प्रवास पूर्ण केला असे कुटे म्हणाले.कुटे यांचे उद्दिष्ट केवळ दर्शन नव्हते, तर ते एक विशेष संदेशही घेऊन आले आहेत. कुटे म्हणतात की आजकाल लोक त्यांच्या व्यस्त दिनचर्येत आणि स्क्रीन टाइममध्ये इतके गुंतलेले आहेत की ते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत.

त्यांना असे वाटते की लोकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून व्यायाम करावा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे असे मत त्यांनी व्यक्त केलेय. राजेंद्र कुरुंद,प्रकाश जोशी,कोलते सर,आई वडील व माझ्या पत्नी यांनी नित्य फोन करून माझे मनोबल वाढविले असे कुटे म्हणाले. कुटे हे पुन्हा नेवासा फाटा येथे आल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी गणेश वरखडे, सचिन गायकवाड, डॉ.मोहनराव कुटे, गणेश कुटे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.त्यानंतर भामाठाम येथे अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने अयोध्या, प्रयागराज, काशी विश्वनाथ वरून आणलेल्या गंगाजलने अडबंगीनाथ तप शीळेचे पूजन, अभिषेक व आई वडील यांचे गांगजलाने पूजन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe