अहमदनगर ब्रेकिंग : अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Published on -

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे. महिलेचा बांधा मध्यम, अंगात टॉप घातलेला, छातीपर्यंत बदामी रंगाचा व छातीपासुन खाली गडद निळ्या रंगाचा व डाव्या बाजुस फाटलेला, त्याला पिन लावलेली तसेच पांढऱ्या धाग्याने शिवलेला, टॉपला छातीवर पत्राचे दोन मोठे पांढऱ्या रंगाचे बटन, लेगीन्स तांबुस रंगाची, कपाळावर डाव्या बाजुस बारीक जखम झालेली आहे.

उजव्या कानात सोनेरी रंगाची रिंग, दोन्ही हातात लाल रंगाच्या बांगड्या, दोन्ही पायात पांढऱ्या रंगाच्या तोरड्या आहेत. पायांच्या बोटात जोडवे, डाव्या हाताच्या दंडावर जुन्या जखमेचे व्रण, एक ओढणी – दोन्ही बाजुस काळे पट्टे व मधल्या बाजुस लाल- निळा- नारंगी रंग असलेली, बाजुलाच गुलाबी रंगाची पर्स, एक सँडल असे या मृतदेहाचे वर्णन आहे.

कुणाला या महिलेविषयी काही माहिती असल्यास राजुर पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी राजुर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शेख करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe