आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा ही अफवा आहे. आपण असा कोणताही निर्णय घेतला नसून राजकीय भूमिका बदलली नसल्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
माजी आ. मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यानंतर याबाबत मुरकुटे यांनी सदरचा खुलासा केला. ते पुढे म्हणाले की,
आपण कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही, अथवा भूमिका बदललेली नाही. राजेंद्र फाळके व अॅड. संदीप वर्षे यांचे व माझे जुने स्नेहसंबंध आहेत. ते श्रीरामपूरला आले असता त्यांनी केवळ स्नेहभेट दिली.
या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे याबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यात तथ्य नसून केवळ अफवा आहे, असे मुरकुटे यांनी सांगितले.