अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील वीरगाव येथील शिवारातून तिरट प्रकारचा जुगार खेळताना पोलिसांकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात अकोले नगरपंचायतच्या माजी नगरसेवकासह १२ आरोपींना अटक करून अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीरगाव येथील फाट्याजवळ रस्त्याच्या आतील आडोशाच्या बाजुला कोंबड्याच्या शेड शेजारी क्लबमधून तिरट नावाचा जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेस मिळाल्याने निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशानुसार पोलिस नाईक खोकले,
कॉन्स्टेबल रणजीत जाधव, राहुल साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर हे पथक अकोल्यात येवून अकोल्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताजय साबळे, पोलीस नाईक महेश आहेर, विठ्ठल शरमाळे, राजेंद्र कोरडे यांच्यासह संयुक्त पथकाने जाऊन वीरगाव फाटा येथे या जुगार अड्ड्यावर छापा मारून
तिरट नावाचा जुगार खेळताना १२ जुगाऱ्यांना अटक केली. यात अकोलेचे माजी नगरसेवक राजेंद्र लोखंडे, भरत गायकवाड ( दोघेही राहणार शाहूनगर), अनिल वाकचौरे (निब्रळ), माणिक चासकर (बहिरवाडी), दिलीप शिंदे (शाहूनगर), अचानक गायकवाड (इंदोरी), भानुदास गोडे (बहिरवाडी),
संदीप वैद्य (कुंभारवाडा, अकोले), मोरेश्वर चौधरी (अकोले), जयराम लांघे (शेणित), पुंडलिक भिडे (कोर्ट शेजारी, अकोले), अक्षय वाकचौरे (परखतपुर) अशा १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळील व डावातील एकूण रक्कम २५ हजार ११० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम