अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीपात्रात आढळून आले महिलेचे प्रेत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मधील भीमा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान याबाबतची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली.

माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक माहिती अशी कि, भीमा नदीच्या पात्रात 60 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलेची डेडबॉडी सापडली आहे.

पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. राशीन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान प्रेत शवविच्छेदनासाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते,

पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठोंबरे, संपत शिंदे, पोलीस पाटील दादासाहेब भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe