अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अकोले पोलिसांनी तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडीच्या गुन्ह्याचा छडा लावून दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. यात आरोपींकडून २ दुकानासह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या दानपेट्या फोडण्याची व दानपेटी चोरीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्यात. आरोपींच्या चौकशीसाठी अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पोलिस पथके तयार केले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/09/Ahmednagar-Breaking-Accused-of-breaking-donation-box-arrested.jpg)
आपल्या खबऱ्याकडून १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास गस्त घालताना महालक्ष्मी मंदिराचे गेटजवळ ३ व्यक्ती संशयीतरित्या फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
यावरून त्यांचा शोध घेण्यात येऊन प्रवरा नदीपल्याड रस्त्याच्या कडेला महालक्ष्मी मंदिरात पोलिस पथकाने नागरिकांच्या मदतीने आरोपी मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ,
राजू ठमा मेंगाळ (दोघेही रा. उंचखडक खुर्द) यांना रंगेहात पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार विलास लक्ष्मण गावंडे (रा. उंचखडक खुर्द) हा पसार झाला.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य, कटावणी, ग्राॅडर, रोख रक्कम व दोन मोटार सायकल हस्तगत केल्या. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली.
अधिक चाैकशीत महालक्ष्मी माता मंदिर अकोले, दत्त मंदिर रुंभोडी (ता. अकोले), अंबिका माता मंदिर (गणोरे) व आंबाबाई मंदिर टाहाकरी या मंदिरातून चोरी केल्याची आरोपीनी कबुली दिली. ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भुषण हांडोरे, पोलिस नाईक अजित घुले, विठ्ठल शेरमाळे, बाळासाहेब गोराणे,
चालक गोविंद मोरे, रवींद्र वलवे, कॉन्स्टेबल आनंद मैड, गणेश शिंदे, प्रदीप बढे, आत्माराम पवार, संदीप भोसले, नागरे यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम