अहमदनगर ब्रेकिंग.. नगर जिल्ह्यातील ‘ या’ आमदारास पुन्हा कोरोनाची लागण ! म्हणाले…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :-  शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी ना.आशुतोष काळे यांची मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

याबाबत आ.काळे यांनी स्वत: ट्विटर वर पोस्ट करून माहिती दिली आहे या मध्ये आ.काळे यांनी म्हणले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी. श्री साईबाबा व आपणा सर्वांचे आशिर्वाद पाठीशी आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही.

आपण सर्वांनी आपली काळजी घ्या असे ना.काळे यांनी म्हंटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe