अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव येथे गोदावरीच्या प्रवाहात मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत एका ४० ते ४५ वर्षीयस इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी ता.१३ सकाळी मोहिनीराज शिवारातील बेट स्मशानभूमीजवळ अंगावर कपडे नसलेल्या

file photo
एका ४० ते ४५ वर्षीय इसमाचा मृतदेह तरंगताना दिसूनबआला. याची खबर अमित साहेबराव खोकले यांनी पोलिसांनी दिली.
त्यानुसार गुरनं.४७/२०२१ सीआरपीसी १७४नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार एस. सी. पवार हे करत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम