राहाता तालुक्यातील साकुरी शिवारातील पुलाणजिक एका दुचाकी स्वराला पेट्रोलच्या टँकरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार साकुरी पुलाजवळ राहता शहराच्या दिशेने हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवर जाणारे चांद लतिफ शेख (वय 34) राहणार साकुरी हे चालले असतांना
नगरच्या दिशेने जाणाऱ्या एच.पी कंपनीच्या पेट्रोल टॅंकर क्रमांक एम.एच 17 टी 2490 च्या मागील टायरच्या खाली आल्याने जागीच ठार झाले. अवघड टँकरने चिरडल्याने घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.
स्थानिकांनी तात्काळ राहता पोलीस स्टेशनला माहिती कळवल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक कल्याण काळे, पोलीस हवालदार सुधाकर काळोखे तसेच पोलीस हवालदार डी.डी तुपे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघात स्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक कोंडी दूर करून रुग्णवाहिकेत पाचारण केले स्थानिकांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेतून शिर्डी येथील रुग्णालयात नेण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार चांद लतिफ शेख हे साबनाचे मोठे व्यापारी असल्याचे समजते दरम्यान पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचले स्थानिकांनी संताप व्यक्त केला.