Ahmednagar Breaking :- राज्य सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी दिली होती. कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या तरी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जिल्ह्यातील कोणत्याच माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आठवडाभरात निर्णय घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीही प्रशासन करोना संसर्ग कमी होताच शाळा, महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करेल, असे सांगितले आहे.