अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेचा अर्धनग्न मृतदेह आढळला !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Breaking :- विवाहित महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह (Woman’s half-naked body)आढळून आल्यामुळे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.अवघ्या वर्षभरापूर्वीच या तरुणीचे लग्न झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, पूजा अतुल मोरे (वय २२, राहणार अरणगाव दुमाला श्रीगोंदा) असं मृत तरुणीचे नाव आहे.

पूजाचा अर्धनग्न मृतदेह राहत्या घरात फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पती अतुल बाळासाहेब मोरे (वय२७) सासरा बाळासाहेब त्रिंबक मोरे (वय५२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील रहिवासी असलेल्या पूजाचे गावातीलच अतुल बाळासाहेब मोरे याच्याशी 19 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले होते.

पती अतुल मोरे याने पूजाकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावून धरला. कार घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी पूजाकडे मागणी करत होता.

त्यामुळे सासु,सासरे,आणि नंनद या तिघाकडून पूजाचा सासरी दररोज मानसिक व शारीरिक छळ होत होता. हा त्रास मयत पुजा माहेरी आईवडील व पती अतुल यांना तोंडी व मोबाईल मेसेज करुन सांगितला होता.

सासरी पूजाचा छळ सुरूच होता. अचानक 8 डिसेंबर रोजी घरात पूजाचा मृतदेह आढळून आला. फॅनला गळफास घेऊन पूजाने आत्महत्या केल्याचे समोर आले.

घटनेची माहिती मिळताच पूजाचा भाऊ संदीप दिवटे आणि चुलत्यांनी घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी पूजावर माहेरच्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पूजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सासरीची लोक हजर नव्हती.

दरम्यान बेलवंडी पोलिसांनी पती अतुल मोरे व सासरे बाळासाहेब मोरे, सासु वैशाली बाळासाहेब मोरे, ननंद मोहिणी मधूकर ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतुल मोरे आणि सासरा बाळासाहेब मोरे याला अटक केली आहे.

माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिला सासरच्या लोकांनी छळ करुण मारले व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून तिचा मृतदेह फासावर अर्धनग्न अवस्थेत लटकविला आहे, असा आरोप महिलेच्या भावाने केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe