अहमदनगर ब्रेकींग: सबस्टेशनमध्ये घुसून कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 AhmednagarLive24:- कार्यालयात घुसून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना मारहाण करण्यात आली. अकोळनेर (ता. नगर) सबस्टेशन येथे ही घटना घडली.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर (दोघे रा. अकोळनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (वय 40 रा. देहेरे ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

वीजेच्या तारा तुटल्यामुळे अकोळनेर शिवारातील गणेश बेरड यांच्या मालकीचा गहू जळाला होता. तेथे वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी भेट देवुन तारा ऐवजी केबल टाकण्यास सांगितले होते.

बेरड यांच्या शेजारी असलेले भोर यांनी त्याला विरोध केला. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अकोळनेर सबस्टेशन येथे जावुन अभियंता बराट यांना जाब विचारला. बराट यांना शिवीगाळ, दमदाटी करून शर्टची कॉलर पकडुन मारहाण केली.

कार्यालयाच्या बाहेर ओढून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वा. ऐ. चव्हाण करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe