अहमदनगर ब्रेकिंग : महिला सरपंचासह ५ जणांवर ठार मारण्याचा गुन्हा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अकोले तालुक्यातील कळस खूर्द येथील पाच जणांच्या विराेधात अकाेले पाेलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. अाराेपींमध्ये कुंभेफळच्या महिला सरपंच प्रिया पवार यांचाही समावेश आहे.

दरम्यान, पाेलिसांनी तिघांना अटक केली. रपंच पवार व सुरेखा रुपवते हे फरार अाहेत. हर्ष पवार, यश पवार, प्रिया प्रशांत पवार, प्रशांत पवार, सुरेखा संजय रुपवते अशी अाराेपींची नावे अाहेत. यातील हर्ष पवार, यश पवार, प्रशांत पवार यांना पोलिसांनी अटक केली.

आरोपी तथा कुंभेफळच्या सरपंच प्रिया पवार व सुरेखा रुपवते या फरार अाहेत. याप्रकरणी वाकचौरे यांनी फिर्याद दिली की, मी माझी पत्नी कमल, मुलगा महेश, मुलगी श्रद्धा असे आम्ही एकत्रच राहतो व शेती व्यवसाय करतो.

१९ ऑक्टोबरला दुपारी कुंभेफळच्या शिवारातील शेतात मी माझी पत्नी कमल, मुलगा महेश व वाटेकरू मंदा पथवे, नुराबाई पथवे, रामदास पथवे असे ट्रॅक्टरने वावर फणत होतो.

यावेळेस तेथे शेजारील हर्ष पवार, यश पवार, प्रिया पवार, प्रशांत पवार, सुरेखा रुपवते यांनी आमच्या शेतात तुम्ही का आले, असे म्हणत आमच्या शेतात तुम्ही काम करावयाचे नाही, असे सांगत मुलगा महेश याला हर्ष पवार याने कुऱ्हाडीने डोक्यात घाव घातला. प्रिया व हर्ष, प्रशांत पवार यांनी मारहाण केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News