अहमदनगर ब्रेकिंग : घाबरायचे कारण नाही… ओमायक्रॉन झालेली महिला ठणठणीत बरी !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरीएंटपेक्षा कमी तीव्रतेचा आजार आहे. मात्र, त्याचा संसर्ग वेग अति जास्त असल्याने धोका वाढतो. सध्यातरी तालुक्यातून तो हद्दपार झाला आहे.(Omicron News)

मात्र, यापुढे सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणा हाच आपल्याला घातक ठरतो.

श्रीरामपूर शहरात १५ डिसेंबर रोजी नायजेरियावरून आलेल्या, माय-लेकापैकी, ६ वर्षीय लहान मुलाचा व ४१ वर्षीय आईचा तपासणी अहवाल कोरोना बाधित आल्याने ओमायक्रॉन तपासणीसाठी तातडीने नुमने पाठविण्यात आले होते.

त्यापैकी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपुरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागासाह प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र, आई ओमायक्रॉन मुक्त झाल्याने दोघानाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

४१ वर्षीय स्त्री आपल्या सहा वर्षीय मुलासोबत नायजेरियावरून आली होती. राज्य आरोग्य विभागाकडून श्रीरामपूर तालुका आरोग्य विभागाकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी १८ रोजी श्रीरामपूर तालुका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय टीमने त्यांची कोरोना चाचणी केली.

त्यात आई आणि मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होताच शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्या टॅक्सीमधून ते आले होते.

त्या चालकासह त्यांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांची तपासणी करण्यात आली असून त्या सर्वांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दरम्यान, या दोघांचे नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान, ज्या खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल आहे,

त्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असून रुग्णांची तब्येत ठणठणीत आहे.

शासनाच्या नियमानुसार त्यांची परत आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. तिचा अहवाल प्राप्त झाला असून दिघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe