Ahmednagar breaking : धक्कादायक ..! ‘या’ ठिकाणी नदीत कोसळली पिकअप ; पोलिसांचे शोधकार्य सुरू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar breaking Shocking Pick-up fell into the river at 'this' place

Ahmednagar breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे जिल्ह्यातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो झाले आहे.

तसेच निळवंडे धरणासह प्रवरा नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रवरा नदी (Pravara River) देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तर दुसरीकडे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील जोर्वे (Jorwe) गावाजवळ प्रवरा नदीपात्रावरील पुलावरून पिकअप (Pickup)गाडी नदीत कोसळून वाहून गेल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्टच्या रात्री घडली आहे. या पिकअपमध्ये गाडी ड्रायव्हरसह आणखी दोनजण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रशासनाकडून शोधकार्य सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी गावातील ग्रामस्थ पुलावरून प्रवास करताना त्यांना संशय आला आणि ही घटना समोर आली.

त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नाशिकहून काच घेऊन आलेली पिकअप गाडी पिंपरणे येथे माल खाली करून काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान माघारी निघाली. मात्र, ती गाडी पुन्हा नाशिकला पोहचली नाही अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुलाला असलेले छोटे कठडे तुटलेले असल्याने आणि चालकाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन त्याच परिसरात दाखवत असल्याने ही गाडी नदी पात्रात कोसळली असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे.

नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. मात्र, नदीवरील पुलाला सुरक्षित कठडे नसल्याने ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe