अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- एका मुलीचे एका युवकासोबत ब्रेकअप होऊन दुसऱ्या युवकाशी प्रेम जडले. यातून दोन युवकांत वाद सुरू झाले. या वादाचे पर्यावसान गोळीबारात झाला.
त्यात एक जखमी झाल्याची घटना श्रीरामपूरात घडली. गोळीबार करणाऱ्या दोघांना श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली. शुभम राजू जवळकर (२३ ,रा.दुर्गानगर, सुतगिरणी), याचे एका मुलीवर प्रेम होते.
नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर या मुलीसोबत शुभम यादव (१८, रा. स्मशानभुमीजवळ वार्ड नं. ६) याचे प्रेम जडले होते. यावरुन या दोघांत यापूर्वी वाद झालेले होते.
सोमवारी रात्री ११ च्या सुमारास दुर्गानगर सुतगिरणी येथे शुभम जवळकरवर शुभम यादवने साथीदारासह येत पिस्टलने गोळी झाडली. यात जवळकरच्या छातीवर जखम झाली.
निरीक्षक संजय सानप, सहायक निरीक्षक संभाजी पाटील, दत्तात्रय उजे, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, पंकज गोसावी, रघुनाथ कारखेले, यांनी आरोपी यादव व मयूर तावर यांना ताब्यात घेतले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम