अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- बेलापूर गावामध्ये जुलै महिन्यामध्ये गुप्तधन सापडल्याची घटना घटना घडली होती.खटोड यांच्या घरी सापडलेल्या या गुप्तधनामध्ये मोठे चांदी व सोने असल्याची तक्रार हे गुप्तधन खोदण्याचे काम करणारा मजूर सुनील गायकवाड यांनी मेडियाच्या समोर केली होती.
त्याच सुनील गायकवाड यांनी बेलापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्यासमोर आपल्या राहत्या घरी काल संध्याकाळी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे बेलापूर गाव व श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सुनील गायकवाड यांनी असा आरोप केला होताा की या गुप्तधनाची विल्हेवाट स्वत:च्या फायद्यासाठी बेलापूरातील काही मुजोर प्रवृत्तीच्या लोकांनी लावली होती .
तसेच या मुजोर प्रवृत्तीच्या लोकांना आपण या प्रकरणाचा निपटारा केला असे देखील वाटत होते.या आरोपानंतर सुनील गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची आवश्यकता असून यामध्ये अनेक “व्हाईट कॅालर गुन्हेगारांचे” हात गुंतलेले असल्याची दबक्या आवाजात बेलापूर गावात चर्चा पूर्वी चालु होती आणि आता सुनील गायकवाड यांच्या मृत्यूनंतर ही चर्चा पुन्हा जोर पकडत आहे.
तरी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाच्या मूळाशी जावुन तपास करून सुनील गायकवाड यांना न्याय द्यावा.त्यांच्यामागे चार मुली,आई ,पत्नी हे पोरके झाले आहेत.काही व्हाईट कॅालर गुन्हेगार प्रवृत्तीच्या अति स्वार्थी व अति लालची लोकांमुळे गोरगरीब मजूर सुनील गायकवाड यांचा जीव गेला आहे अशी देखील चर्चा गावात चालू आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम