अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- बसमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.
दरम्यान या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, मंगळवारी ( दि. २१) सकाळी साडे

सहाच्या सुमारास एम. एच. १४, बी. टी. ४८८७ क्रमांकाच्या पाथर्डी-नशिक या बसमध्ये याच बसच्या चालकाने संगमनेर बसस्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुभाष तेलोरे ( रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या चालकाचे नाव आहे. आत्महत्या का केली तसेच हि आत्महत्या आहे कि घातपात याबाबात अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम