अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या लोकनियुक्त सरपंचांचे पद रद्द !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावानंतर 5 जुलैला विशेष सभा बोलावण्यात आली होती.

सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आल्याने या बाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. त्यांच्या आदेशानुसार आज ( ता. 13 ) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानुसार घुलेवाडीच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळी 9 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली.ग्रामसभेत ठरावाच्या बाजूने व विरोधात असे दोन्ही मतप्रवाह असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मतदान प्रक्रीया राबविली.

त्यात अविश्‍वास ठरावाच्या बाजूने 1 हजार 184 तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 15 मते पडली. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्यावरील अविश्‍वास ठराव 169 मतांनी मंजूर झाल्याने त्यांचे सरपंचपद संपुष्टात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या या गावातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने, राजकारण ढवळले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe