अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नेवासा पोलिस स्टेशनच्या तथाकथित गैरव्यवहाराच्या ऑडिओ क्लिपचे पडसाद म्हणून पोलिस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच हेड कॉन्स्टेबल व पाच पोलिस कर्मचाऱ्यांची एकाच महिन्यात बदली करण्यात आली आहे.
त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या बदल्या प्रशासकीय पद्धतीने केल्याचे स्पष्ट केले आहे. नेवासा पोलिसांच्या दोन ऑडिओ क्लिप जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाजल्या.
पहिल्या क्लिपचा साईड इफेक्ट म्हणून एडिशनल एसपी व आठ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आणि नेवासा पोलिस स्टेशनचे संबंधित कर्मचारी व पोलिस निरीक्षकांची बदली झाली होती.
आता दुसऱ्या ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांच्या अचानक बदल्या झाल्या. पोलिस निरीक्षक विजय करे यांची नगरला रवानगी करुन विजय ठाकूर यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली होती.
परंतु अचानक शनिशिंगणापूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्याकडे नेवासा ठाण्याची सूत्रे सोपवली गेली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
सहायक निरीक्षक विजय ठाकूर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक भरत दाते व पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांचीही बदली झाली. आता तडकाफडकी ६ कर्मचाऱ्यांच्या तालुक्याबाहेर बदल्या झाल्या. बदली केलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम