अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथील एका तळ्यात ३ लहान मुले बुडून मरण पावण्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव दुसऱ्या दिवशी सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते.
यापैकी काही पाण्यात उतरल्याचे समजते. मात्र पोहता येत नसल्याने या ठिकाणी तिघे जण बुडून मृत पावल्याचे समजते. या तळ्यामध्ये बुडून मृत पावलेल्या लहान मुलांची वय ही अंदाजे ७ ते ८ वर्षाचे असल्याचे समजते.
सदर लहान मुले शेताकडे खेळत असताना अचानकपणे ते तलावाच्याजवळ गेले आणि पोहता येत नसल्याने व तळ्यातील पाणी व खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ही तीन लहान मुले या तळ्यात पडून मृत पावली.
याबाबतची माहिती समजताच पोलीस निरीक्षक साळवे हे दुपारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी या लहान मुलाचे मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात आले होते. या ठिकाणी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मृत पावलेली तिन्ही लहान मुले गरीब कुटुंबातील आहेत. दुपारी या ठिकाणी पंचनाम्याचे काम सुरू होते. वर्षाच्या दरम्यानची ही तिनही लहान मुले अशाप्रकारे दुर्दैवीपणे मरण पावल्याने घटनास्थळी त्यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता.
सदर हृदयद्रावक घटना समजल्यानंतर गावामध्येही शोककळा पसरली होती. सुरुवातीला ही मुले गणेश मूर्त्या शोधायला गेल्याची चर्चा झाली होती, परंतु तसे काही नसल्याचे पोनि साळवे यांनी सांगितले. खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि बुडून मरण पावल्याचे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम