अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री निवडीसाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून यात उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आले आहे दरम्यान, आज बुधवारी नूतन पालकमंत्र्यांची घोषणा झाली,
तर नगरची उद्या गुरुवारी होणारी नियोजन समितीची बैठक ही नूतन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होवू शकते.

गेल्या अनेक दिवसांपासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती.
यामध्ये नगरचा अनुभव असलेले मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यापाठोपाठ नगरमधून मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके आदी नावांचीही चर्चा होती.
मुुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.
यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय, कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम