अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- एका ४५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे घडली आहे.
पुष्पाताई ज्ञानेश्वर आगवान ( ४५, रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, याबाबत कोपरगाव तालुका पोलिसात नोंद केली आहे.

file photo
याबाबत अधिक माहिती अशी की, पुष्पाताई आगवान यांनी दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस नाईक कोकाटे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम