अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 Ahmednagar News :- राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनासंबंधी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध एक एप्रिलच्या मध्यरात्रीपासून हटविण्यात येत आहेत, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढला आहे.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता मास्क वापरण्याची सक्ती नाही. यासंबंधी आदेशात उल्लेख करताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सर्व नागरिक, संस्था आणि अस्थापनांना मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे अशा कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करणे व्यक्तींच्या व समाजाच्या सुरक्षिततेसाठी हितकार असेल.
याचा अर्थ यापुढे मास्कचीही सक्ती नाही, मात्र हितकारक म्हणून तो वापरण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रतिबंधासाठी वेळोवेळी देण्यात आलेले सर्व आदेश या आदेशानुसार आता रद्द करण्यात आले आहेत.