अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ३३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३४ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ५७८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २९३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटीजेन चाचणीत २९७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०१, जामखेड १७, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १७, नेवासा ०७, पारनेर ४४, पाथर्डी ७१, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ५२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ५२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १८, जामखेड ०७, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा.१०, नेवासा ३५, पारनेर १९, पाथर्डी ०४, राहाता ४५, राहुरी ३३, संगमनेर ७३, शेवगाव २८, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २९७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ३९, जामखेड ०५, कर्जत २७, कोपरगाव ०७, नगर ग्रा. १६, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३१, राहाता १६, राहुरी १२, संगमनेर ६१, शेवगाव ११, श्रीगोंदा १०, श्रीरामपुर ११ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले ८४, जामखेड ०८, कर्जत ६०, कोपरगाव २४, नगर ग्रा. २७, नेवासा ३३, पारनेर ८८, पाथर्डी ३८, राहाता २९, राहुरी ३५, संगमनेर १३२, शेवगाव २७, श्रीगोंदा ७५, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,२२,३३८
उपचार सुरू असलेले रूग्ण:५५७८
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६७३
एकूण रूग्ण संख्या:३,३४,५८९
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम