अहमदनगर जिल्ह्यात ! आजारपणाला कंटाळून एकाची आत्महत्या

Published on -

Ahmednagar News : सततच्या आजारपणाला कंटाळून ७० वर्षीय व्‌द्धाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्‍यातील खंडाळा येथे शुक्रवारी (दि.२५) सकाळी घडली. नानाभाऊ गणपत यादव (रा.खंडाळा, ता.नगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती यादव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी (दि.२५) सकाळी राहत्या घरात गळफास घेतला.

ही बाब त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांना बोलावले. कार्ले यांनीही तातडीने यादव यांच्या घरी धाव घेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले.

मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी यादव यांना मयत घोषित केले. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी यादव यांच्यावर खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत यादव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe