Ahmednagar Hospital Fire : एसीला आग लागली ऑक्सिजन पुरवठा बंद केला आणि…

Published on -

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर मधल्या जिल्हा रुग्णालयात भीषण आग लागून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागात ही आग लागली असून रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण करोनाबाधित होते.यातील दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अतिदक्षता विभागात १७ रुग्ण उपचार घेत होते. या विभागातल्या एसीला आग लागली. बचावकार्यादरम्यान विभागातला ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला.

त्यामुळे तसंच आगीमुळेही गुदमरुन काही जणांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे होरपळून झाला की गुदमरुन झाला याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!