Ahmednagar news : नेत्यांबाबत सोशल मीडियावर अक्षेपाहार्य पोस्ट व्हायरल केल्यावरून पाथर्डी तालुक्यात बंद आणि निषेध मोर्चा काढण्यात येत आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात अक्षेपहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा घटनेनंतर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने अक्षेपाहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे परिसरातील मराठा समाज बांधवांसह इतर काही समाजातील तरुणांनी एकत्रित येत तिसगाव शहर पूर्णपणे बंद ठेवून वृद्धेश्वर चौक ते शेवगाव रोड बस चौकापर्यंत मोर्चा काढून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत, अशा अक्षेपहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली.
दोन दिवसांपूर्वी शिरापूर येथील एका तरुणाने पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भात अक्षेपहार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती, त्यानंतर मोठा संताप व्यक्त करून शुक्रवारी वंजारी समाज बांधवांच्यावतीने पाथर्डी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
त्याच बरोबर पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हादेखील दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी अशीच एक पोस्ट मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी पाथर्डी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी करत शनिवारी तिसगाव बंदचे आव्हान केले होते. शनिवारी सकाळी वृद्धेश्वर चौकात मराठा समाजाच्या तरुणांबरोबरच इतर समाजाचे तरुण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
या तरुणांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपहार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करत हा मोर्चा शेवगाव रोडवरील बसस्थानक चौकामध्ये दाखल झाला. त्या ठिकाणी अनेकांनी मनोगत व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपहार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्ती विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी तसेच कोणत्याच समाजातील व्यक्तीने इतर समाजा संदर्भात अथवा नेत्यांविरोधात आक्षेपहार्य पोस्ट व्हायरल करू नये, असे आवाहन करत वायकर व आठरे यांना मारहाण केल्याच्या घटनेचादेखील यावेळी उपस्थितांनी निषेध व्यक्त केला.