Ahmednagar Politics : १८ डिसेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह अहमदनगर जिल्ह्यात येणार !

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्‍या उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.(Ahmednagar Politics) 

सहकार चळवळीला नवी दिशा देणा-या या सहकार परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी जय्यत तयारी करावी असे आवाहन त्‍यांनी केले.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत प्रवरानगर येथे शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वा.राज्‍यस्‍तरीय सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे.

विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न होणा-या या परिषदेस केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना,

सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार असल्‍याचे आ.विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत सांगितले.

सहकार परिषदेच्‍या निमि‍त्‍ताने प्रवरानगर येथील कामगार सांस्‍कृतीक भवनात तालुक्‍यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती.

या बैठकीस माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर,

तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, सभापती सौ.नंदाताई तांबे, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन विश्‍वासराव कडू, गणेश कारखान्‍याचे व्‍हा.चेअरमन प्रतापराव जगताप, अॅड.रघुनाथ बोठे, नंदू राठी, अशोकराव म्‍हसे,

ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, जि.प सदस्‍या सौ.रोहीणी निघुते, दिनेश बर्डे, भाजयुमोचे सचिन तांबे,सतिष बावके, अभय शेळके, कैलास तांबे, नंदकुमार जेजूरकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात आ.विखे पाटील म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्‍थापना केली. मंत्री अमित शाह यांच्‍याकडे या विभागाचा कार्यभार सुपूर्त करण्‍यात आला.

सहकार चळवळीच्‍या दृष्‍टीने ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. सहकार मंत्री झाल्‍यानंतर अमित शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती.

प्रवरा परिसराच्‍या दृष्‍टीने हा एक सुवर्णक्षण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर सेवा सहकारी सोसायटी पासुन ते कारखानदारी पर्यंत आणि सहकारी पतसंस्‍थेपासुन ते सहकारी बॅंकींग क्षेत्राला बळकटी देण्‍याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे.

या सहकार परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने घेतलेल्‍या या ऐतिहासिक निर्णयबाद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

प्रवरा परिसरात यापूर्वीही देशपातळीवरील असंख्‍य नेत्‍यांनी येवून पद्मश्रींनी सुरु केलेल्‍या सहकार चळवळीच्‍या कार्याला दाद दिली. सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत होणा-या या राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेत सहकार चळवळी पुढील प्रश्‍नांचा ओहापोह होवून नवी दिशा मिळेल असा विश्‍वास आ.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांचेही भाषण झाली. खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात सहकार परिषदेच्‍या नियोजनाची माहीती कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe