Air Cooler : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाला आहे. सकाळपासून उन्हाचे जबरदस्त चटके बसू लागले आहेत. त्यामुळे कूलिंग प्रोडक्ट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. समजा जर तुम्ही नवीन एअर कूलर खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुम्ही एक जबरदस्त कुलर खरेदी करायला हवा.
नाहीतर तुमचे पैसे वाया गेलाच म्हणून समजा. तसेच कूलर खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. बाजारात असे काही कूलर आहेत ज्याच्या समोर AC ही फेल आहेत. इतकेच नाही तर याची किंमतही खूपच कमी आहे.
1. सिम्फनी टच 20
तुम्ही आता सिम्पानीचा कूलर ६,६९९ रुपयांना सहज खरेदी करू शकता, ज्याची पाणी साठवण क्षमता २० लीटर इतकी आहे, या कुलरमध्ये iPure तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. लहान खोली किंवा एकट्या व्यक्तीसाठी सगळ्यात परिपूर्ण कूलर जे तुमची खोली कमालीची थंड करू शकतो. इतकंच नाही तर या कुलरचे फिचर म्हणजे तो घामाची समस्या दूर करू शकतो.
2. बजाज PX 97 टॉर्क
त्याशिवाय तुम्ही आता बजाजचा कूलर रु.5,799 मध्ये सहज खरेदी करू शकता. या कूलरची पाणी साठवण क्षमता 36 लिटर इतकी असून जी एक ते दोन लोकांसाठी उत्तम आहे. हे टर्बो फॅन तंत्रज्ञान सर्वोत्तम एअर कूलर असून ज्याची हवा देण्याची क्षमता सर्वोत्तम मानली जाते. त्याची दोन वर्षांची वॉरंटी ग्राहकांसाठी देण्यात येत आहे. या कूलरमध्ये तुम्हाला हवा वाढवणे किंवा कमी करण्याचा पर्यायही देण्यात येत आहे.
3. Kenstar निक्स पोर्टेबल टेबल
तुम्ही आता Amazon वरून सर्वात कमी किमतीत Rs.3,989 मध्ये केनस्टारचे कूलर खरेदी करू शकता. याबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ते घराच्या किंवा दुकानाच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता, जेणेकरून संपूर्ण खोली थंड राहू शकते. कंपनीकडून यात 80W पॉवर, नेट डस्ट फिल्टर आणि 12 लिटर पाण्याची टाकी देण्यात आली आहे. यात चार चाके देण्यात येत असून त्यामुळे तो कूलर एकजागेहून सहज दुसऱ्या जागी हलवता येईल.