Airtel 5G: देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी Airtel आतापर्यंत अनेक शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे तर काही शहरात टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो Airtel ने आपली 5G सेवा आतापर्यंत तब्बल 14 शहरांमध्ये सुरु केली आहे.
यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Airtel या 14 शहरांमध्ये मोफत 5G सेवा देत आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही देखील फ्रीमध्ये कुठे आणि कसे 5G सेवा प्राप्त करू शकतात.
एअरटेल 5G या शहरांमध्ये सुरू झाले
एअरटेलचे 5G नेटवर्क सध्या 14 शहरांमध्ये सुरू झाले आहे. या शहरांमध्ये शिमला, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम, पटना, गुवाहाटी, नागपूर, सिलीगुडी, दिल्ली, मुंबई, वाराणसी, लखनौ आणि पानिपत या शहरांची नावे समाविष्ट आहेत.
यासोबतच कंपनीने घोषणा केली आहे की आता हैदराबाद शहरातील अनेक ठिकाणी 5G सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 5G सेवा मोफत सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच या 14 शहरांच्या रेल्वे स्टेशन आणि मेट्रो स्टेशनवर तुम्ही तुमच्या 5G मोबाईलमध्ये हायस्पीड इंटरनेट वापरू शकता.
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की जेथे 4G सेवा अनेक मोठ्या भागात योग्यरित्या कार्य करत नाही. अशा ठिकाणी एअरटेलचे 5G नेटवर्क मोफत वापरण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तथापि, प्रवाशांकडे 5G डिव्हाइस असेल तरच त्यांना 5G सेवा मिळेल.
तसेच कंपनी सध्या कोणत्याही स्पेशल टॅरिफ प्लॅनशिवाय 5G सेवा मोफत देत आहे. एअरटेल येत्या 10 दिवसांत 5G बाबत आणखी मोठे निर्णय घेऊ शकते. असे सांगण्यात आले आहे की येत्या 10 दिवसांत कंपनी इतर काही शहरांमध्ये 5G सेवा सुरू करू शकते. कंपनी यासह 5G NSA नेटवर्क पसरवत आहे.
हे पण वाचा :- Mangal Gochar 2023: ‘या’ लोकांसाठी 2023 ठरणार लकी ! करिअरमध्ये होणार मोठा फायदा ; वाचा सविस्तर माहिती