Airtel Cheapest Recharge : आपल्या ग्राहकांसाठी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel ने एक भन्नाट प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनचा फायदा घेत तुम्हीही अगदी स्वस्तात वर्षभरासाठी रिचार्ज करू शकतात.
कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1799 रुपयांचा प्लॅन स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तसेच डेटाचा फायदा देखील घेता येणार आहे.चला तर जाणून घ्या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Airtel 1799 Plan
एअरटेलच्या या प्लानची किंमत 1799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा देण्यात आला आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल आणि नॅशनल कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. यात एकूण 24 जीबी डेटा मिळतो. हा प्लान खासकरून अशा यूजर्ससाठी आहे जे कमी डेटा वापरतात. कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त, एअरटेलच्या 1799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3600 एसएमएस मिळतात.
तसेच, Apollo 24/7 चे मोफत सबस्क्रिप्शन, मोफत Hellotune आणि Wynk Music ऑफर केले जाते. एवढेच नाही तर 100 रुपयांच्या FASTag वर कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही एकूण 24 GB वापरल्यास, तुमच्याकडून प्रति एमबी 50 पैसे आकारले जातील.
jio आणि vi चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन
Airtel प्रमाणे, Vodafone Idea आणि Jio वार्षिक योजना ऑफर करतात. Vi चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान Rs 1,799 मध्ये येतो. तर Jio चा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान Rs 1,559 मध्ये येतो. Vodafone Idea च्या 1,799 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा, व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता दिली जात आहे. Jio च्या 1,559 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंग मिळते. तसेच अनेक अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवा.
हे पण वाचा :- iPhone 13 Offers : बिनधास्त करा खरेदी ! आयफोनवर मिळत आहे 30 हजारांची सूट ; जाणून घ्या कसा होणार फायदा