Airtel Free Data : एअरटेलच्या ग्राहकांना मिळत आहे फ्री डेटा, अशाप्रकारे मिळवा

Ahmednagarlive24 office
Published:

Airtel Free Data : सर्वात आघाडीची असणारी टेलिकॉम कंपनी Airtel आपल्या ग्राहकांना चक्क 2 जीबी डेटा मोफत देत आहे. परंतु, जर ग्राहकांना याचा लाभ घ्यायचा असेल तर Airtel Thanks या अ‍ॅपद्वारे रिचार्ज करावा लागेल.

आपल्या ग्राहकांसाठी Airtel सतत नवनवीन प्लॅन्स आणत असते.अशातच कंपनीने आणखी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. जर तुम्हाला या प्लानचा लाभ घ्यायचा असेल तर Airtel Thanks अ‍ॅपवरून रिचार्ज करावा लागेल.

जास्तीत जास्त ग्राहकांनी एअरटेलचे अ‍ॅप वापरावे अशी कंपनीची इच्छा आहे. म्हणूनच कंपनी आता प्रमोशनल ऑफर म्हणून निवडक प्रीपेड प्लॅन्स निवडणाऱ्या वापरकर्त्यांना अ‍ॅपवरून रिचार्जवर विनामूल्य डेटा देत आहे. 2GB डेटा कूपन मोफत असणाऱ्या प्लॅनची किंमत फक्त रु.58 पासून सुरू होते.

मिळतोय डेटा फ्री

जर तुमचा रिचार्ज संपणार आहे आणि तुम्हाला अमर्यादित प्रीपेड प्लॅनची ​​निवड करायची असेल तर तुम्हाला निवडक प्लॅनसह अ‍ॅपवरून रिचार्ज करावे लागेल. वापरकर्त्यांना 265 रुपये, रुपये 359, रुपये 549, रुपये 699, रुपये 719 आणि रुपये 839 च्या अमर्यादित प्लॅनमधून रिचार्ज करत असताना 2GB मोफत डेटा कूपन दिले जातील, जे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार वापरता येतील.

असा मिळणार लाभ

हे लक्षात घ्या की केवळ 58 रुपये, 65 रुपये आणि 98 रुपयांच्या डेटा पॅकमधून रिचार्ज केला तर वापरकर्त्यांना 2GB डेटा मोफत मिळेल. हे डेटा पॅक अनुक्रमे 3GB, 4GB आणि 5GB अतिरिक्त डेटा देतात.

वापरकर्त्यांना एका महिन्यासाठी Airtel Xstream मोबाईल पॅक, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, 3 महिन्यांसाठी अपोलो 24/7 सर्कल ऍक्सेस आणि निवडक अमर्यादित प्लॅनसह फ्री विंक म्युझिक सारखे फायद्यांचा लाभ घेता येईल.

मिळतात अनेक फायदे 

एअरटेल थँक्स अ‍ॅपमध्ये, वापरकर्त्यांना एअरटेल पेमेंट्स बँकेच्या प्रवेशाव्यतिरिक्त एअरटेल शॉप, डिस्कव्हर आणि मदत विभागांचा लाभ मिळतो. अशाप्रकारे, हे अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी ‘वन स्टॉप डिजिटल सोल्यूशन’ सारखे काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe