Airtel Recharge Plan : ग्राहकांची चांदी! 2GB डेटासह मोफत घेता येईल OTT चा आनंद घ्या, किंमत आहे फक्त..

Published on -

Airtel Recharge Plan : जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन रिचार्ज प्लॅन आणले आहेत ज्यांची किंमत खूप कमी आहे. यात 2GB डेटासह मोफत OTT चा आनंद घेता येईल.

तुम्ही अशा भागात राहत असाल ज्या ठिकाणी Airtel ची 5G सेवा सुरू झाली आहे आणि तुम्ही 5G फोन वापरत असल्यास तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज केला तर, तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेता येईल. इतकेच नाही तर हा प्लॅन सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दैनिक एसएमएस फायदे देतो. यासह अनेक अतिरिक्त फायदे मिळतात.

एअरटेलचा 319 रुपयांचा प्लॅन

या रिचार्ज प्लॅनमध्ये, कंपनीच्या ग्राहकांना दररोज 2GB डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच यात दररोज 100 एसएमएस मिळतात. अनलिमिटेड 5G डेटासह पूर्ण महिन्याच्या वैधतेसह प्लॅनमध्ये प्रदान करण्यात आलेल्या अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर यात अपोलो 24/7 सर्कल सदस्यत्व, विनामूल्य विंक म्युझिक आणि 3 महिन्यांसाठी विनामूल्य हेलोट्यून्स मिळेल.

एअरटेल 359 रुपयांचा प्लॅन

समजा तुम्हाला Airtel Xstream Play सारखे OTT फायदे पाहिजे असतील तर तुम्ही 359 रुपयांचा प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. हा प्लॅन 5 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. अमर्यादित 5G डेटा शिवाय, यात अपोलो 24/7 सर्कल मेंबरशिप, मोफत विंक म्युझिक आणि 3 महिन्यांसाठी मोफत हेलोट्यून्स मिळतात.

Airtel Xstream Play सह, ग्राहकांना 15 पेक्षा जास्त OTT सेवांमधून सामग्री पाहण्याचा पर्याय मिळतो. त्यांच्या यादीत Sony LIV, Lionsgate Play, Fancode, Eros Now, hoichoi, ManoramaMAX आणि इतर अनेक नावांचा समावेश असून या शानदार प्लॅनसह त्याचे सबस्क्रिप्शन 28 दिवसांसाठी मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News