Airtel Recharge Plan : जर तुम्ही कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि शानदार ऑफर प्लॅन घेऊन येत असते.
याचा फायदा कंपनीच्या ग्राहकांनाही होताना दिसत आहे. शानदार ऑफरमुळे कंपनी इतर आघडीच्या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत असते. असेच काही प्लॅन कंपनीने आणले आहे. ज्याची किंमत अवघ्या 19 रुपयांपासून सुरु होत आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर.
कंपनीचा 29 रुपयांचा रिचार्ज
29 रुपयांचा डेटा पॅक हा कंपनीच्या यादीतील नवीनतम डेटा प्लॅन असून हा प्लॅन ग्राहकांना 2GB हाय-स्पीड डेटा ऑफर करतो, ज्याची फक्त एका दिवसासाठी वैधता आहे. समजा एकदा डेटा कोटा संपला, की ग्राहकांकडून अतिरिक्त डेटासाठी 50 पैसे प्रति एमबी शुल्क आकारण्यात येईल. ब्राउझिंग, मेसेजिंग आणि लाइट व्हिडिओ स्ट्रीमिंग यासारख्या इंटरनेट वापरासाठी ज्या ग्राहकांना थोड्या प्रमाणात डेटा गरजेचा आहे त्या ग्राहकांसाठी हा पॅक खूप फायद्याचा आहे.
कंपनीचा 19 रुपयांचा रिचार्ज
कंपनीचा हा खूप स्वस्त प्लॅन असून याची किंमत 19 रुपये इतकी आहे. कंपनीचा हा एंट्री-लेव्हल पॅक असून तो 1GB डेटा ऑफर करतो, ज्याची वैधता फक्त एका दिवसासाठी वैध आहे. हा रिचार्ज फक्त डेटाची गरज असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ठीक आहे किंवा ज्यांना अल्पकालीन डेटा बूस्टची गरज पडते.
कंपनीचा 58 रुपयांचा रिचार्ज
ज्या ग्राहकांना जास्त डेटाची गरज आहे ते कंपनीचा 58 रुपयांच्या डेटा पॅकचा रिचार्ज करू शकतात. कंपनीचा हा 58 रुपये किमतीचा पॅक सध्याच्या प्लॅनच्या वैधतेसह 3GB डेटा ऑफर करत आहे. डेटा फायद्यांशिवाय, ग्राहकांना एक फ्री 2GB डेटा कूपन तसेच एक विशेष अॅप-ओन्ली ऑफर मिळत आहे. मात्र हे अतिरिक्त डेटा कूपन फक्त Airtel Thanks अॅपद्वारे उपलब्ध असणार आहे.
कंपनीचे हे एक-दिवसीय वैधता डेटा टॉप-अप पॅक अशा वापरकर्त्यांना सुविधा देत असतात ज्यांना अनपेक्षित वापरासाठी किंवा अल्पकालीन आवश्यकतांसाठी लहान डेटा टॉप-अपची गरज आहे. जर तुम्हाला या डेटा टॉप-अप पॅकचा लाभ घ्यायचा असेल तर, ग्राहकांना त्यांचे प्रीपेड रिचार्ज एअरटेल थँक्स अॅप किंवा एअरटेल वेबसाइटवरून करता येतात. याबाबत कंपनीने नुकतीच एक घोषणा केली असून Airtel 5G Plus 3500 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहे.