Airtel Recharge Plan : जर तुम्ही लोकप्रिय टेलिकॉम कंपनी एअरटेलचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या एका प्लॅनच्या फायद्यांमध्ये बदल केला आहे. ज्यामुळे आता कंपनीच्या वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये पूर्वीपेक्षा जास्त फायद्यांचा लाभ घेता येईल.
विशेष म्हणजे या रिचार्ज प्लॅनची किंमत तुमच्या बजेटमध्येच आहे. 99 रुपये किंमत असणाऱ्या या प्लॅनमध्ये आता 40GB डेटा आणि अधिक वैधता मिळणार आहे. ज्याचा फायदा कंपनीच्या ग्राहकांना होईल. दरम्यान, ही कंपनी सतत रिलायन्स जिओला टक्कर देत असते. या दोन्ही कंपन्यांनी आपली 5G सेवा सुरु केली आहे. इतकेच नाही तर दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. आता कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी प्लॅनमध्ये बदल केला आहे.

पूर्वी डेटा पॅकमध्ये काय उपलब्ध होते? पहा
याअगोदर, कंपनीच्या 99 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये, कंपनीच्या ग्राहकांना 30GB FUP मर्यादा आणि 1 दिवसाच्या वैधतेसह अनलिमिटेड डेटा मिळत होता. तसेच 30GB हाय-स्पीड डेटा संपल्यानंतरही, ग्राहकांना 64 Kbps वेगाने अनलिमिटेड डेटा वापरता येत होता. परंतु एअरटेलने आता प्लॅनला जास्त आकर्षक बनवण्यासाठी त्याचे फायदे सुधारित केले आहेत.
नवीन काय आहे?
आता कंपनीच्या 99 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये ग्राहकांना 2 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड डेटा मिळेल. मात्र डेटा FUP मर्यादा आता 20GB प्रतिदिन केली आहे, त्यानंतर हा स्पीड 64 Kbps पर्यंत जातो. एकंदरीत याचा अर्थ असा की एअरटेल आपल्या ग्राहकांना आता दोन दिवसांसाठी दररोज 20GB म्हणजेच एकूण 40GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध करून देत आहे.
या दुरुस्तीसह, एअरटेलने एक दिवसाच्या अतिरिक्त वैधतेसह एकूण डेटा लाभ 10GB ने वाढविला असला तरी हे लक्षात ठेवा की या डेटा पॅकचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय बेस प्लॅन असणे खूप गरजेचे आहे.