Ajab Gajab News : भारतामध्ये (India) कंटाळा घालवण्यासाठी किंवा फ्रेश होण्यासाठी चहा पिला जातो. तसेच भारतीयांसाठी चहा (Tea) म्हणजे एक अमृतच असल्याचे समजले जाते. काही लोकांना चहाची इतकी आवड असते की ते चहा पिण्याची एकही संधी सोडत नाहीत.
चहा प्यायला सर्वांनाच आवडते. काही लोकांसाठी सकाळ चहाशिवाय होत नाही. तर काही लोकांसाठी चहा ही ऊर्जा आहे. चहाप्रेमी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तिथला चहा करून बघायला विसरू नका. आता रस्त्यावरील विक्रेत्यांनी चहामध्ये वेगवेगळे फ्लेवर मिसळले आहेत.

गुलाबी चहा (Pink Tea) चर्चेचा विषय
सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक चहा चांगलाच व्हायरल होत आहे. हा चहा लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. रस्त्यावरील एक विक्रेता गुलाबी रंगाचा खास चहा बनवत असल्याचे व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे.
हा चहा प्यायला लोक आतुर होत आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की त्याचा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि 4 लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चहा बनवण्यासाठी दुकानदार आधी कपातील खारी तोडतो. यानंतर, त्यात घरगुती पांढर्या लोणीचा तुकडा घालतो. यानंतर, दुकानदार कपमध्ये पारंपारिक समोवरमधून गुलाबी रंगाचा चहा ओततो.
@yumyumindia नावाच्या एका फूड ब्लॉगरने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केला आहे. फूड ब्लॉगरने सांगितले की, हे गुलाबी चहाचे दुकान लखनऊमध्ये आहे.
या चहाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘ये गुलाबी नहीं दोपहर चाय है’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हा काश्मिरी चहा आहे आणि त्याची चव अप्रतिम आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की गुलाबी रंगाचा चहा जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये ‘नून चाय’ म्हणून ओळखला जातो. त्याची चव खारट आहे. काश्मीरमध्ये याला ‘शीर चाय’ म्हणूनही ओळखले जाते, जो काश्मीरचा पारंपारिक चहा आहे.













