Ajab Gajab News : चर्चा तर होणारच, सूट-बूट घातलेला रस्त्याच्या कडेला फेरीवाला पाहिला आहे का? मग ‘हा’ व्हिडिओ पहाच

Content Team
Published:

Ajab Gajab News : लोक (People) रस्त्याच्या कडेला दुकान लावून पैसे कमवतात. यावेळी त्यांचा पोशाख हा सर्वसामान्य असतो, मात्र रस्त्याच्या कडेला सूट-बूट (Suit-boots) घातलेला फेरीवाला पहिला तर चर्चेचा विषय होणारच आहे.

हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स (Hotel management course) केल्यांनतर दोन तरुण मुलं आपलं करिअर (Career) घडवण्यासाठी खूप मेहनत घेतात, पण त्यांना नंतर कळतं की त्यांचा स्वतःचा व्यवसाय (Business) असावा. यामुळे ते रस्त्याच्या कडेला सूट-बूट घालून दुकान उघडतात.

२२ वर्षांच्या दोन तरुण मुलांनी हातगाडीवर दुकान उघडले

होय, आम्ही बोलत आहोत दोन २२ वर्षांच्या तरुण मुलांबद्दल ज्यांनी पटियालामध्ये रस्त्याच्या कडेला आपले दुकान उघडले आहे. सर्वप्रथम चहा विकण्याचे काम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. हळूहळू व्यवसाय मोठा केला आणि आता टिक्की-गोलगप्पा विकतोय.

दोन्ही मुलांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि नंतर ‘डॉमिनोज’मध्ये त्यांच्या करिअरला सुरुवात केली, पण नंतर वैयक्तिक बचत करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. घरी दोघांनीही न सांगता आपापले काम सुरू केले.

सूट-बूट घालून टिक्की-गोलगप्पा विकतात

कोविड काळात त्यांचे काम थांबले असले तरी त्यांनी चहा विकणे सुरूच ठेवले. हॅरीने सांगितले की, त्याने रात्रंदिवस मेहनत केली, रात्री अडीच वाजेपर्यंत भांडी धुतली. सध्या, आता दोघेही रस्त्याच्या कडेला टिक्की-गोलगप्पा विकत आहेत आणि लोकांना दररोज चांगले जेवण देतात.

गाडीवर जेवणाऱ्यांची मोठी गर्दी असते. युट्यूबवर हॅरी उप्पल नावाच्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ६ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ २१ हजार लोकांनी लाइक केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe