Ajab Gajab News : जगात अशा काही गोष्टी घडत असतात त्या पाहिल्यावर किंवा ऐकल्यावर विश्वास बसत नाही. अशाच काही पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असतात. जर तुम्हाला सांगितले की या ठिकाणच्या महिला (womens) फक्त एकदाच अंघोळ करतात तर तुम्हालाही किळस येईल. पण हो हे खरं आहे.
आंघोळ करायला कोणाला आवडत नाही? आंघोळ केल्यावर शरीरात ताजेपणा जाणवतो तसेच आरोग्य चांगले राहते, पण आज तुम्हाला अशा ठिकाणाविषयी सांगत आहोत जिथे महिला आयुष्यात एकदाच आंघोळ (Women bathe once) करतात. पण तरीही या महिलांचे सौंदर्य पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

यामागील लपलेले सत्य तुम्हाला सांगतो – हे ठिकाण आफ्रिकेतील उत्तर-पश्चिम नामिबियाच्या कुनैन प्रांतात आहे, जिथे हिंबा जमातीच्या महिला राहतात आणि या सर्व महिला आयुष्यात एकदाच स्नान करतात.
या महिला केवळ लग्नातच आंघोळ करतात आणि त्याआधी किंवा नंतर त्या पाण्याला हातही लावत नाहीत. खरे तर या महिलांना पाण्याला हात लावायलाही मनाई आहे, त्यामुळे या महिला कपडेही धुत नाहीत.
या महिलांचे फोटो पाहून तुम्हालाही त्यांचा रंग लाल वाटू शकतो पण यामागे एक कारण आहे. या जमातीच्या महिला कधीच आंघोळ करत नसतात पण त्या जडीबुटीचा वापर करतात ज्यामुळे त्यांचे शरीर ताजे राहते.
स्त्रिया ही औषधी पाण्यात उकळतात आणि त्याचा धूर अंगावर लावतात जेणेकरून आंघोळ केल्याशिवाय त्यांच्या अंगाला वास येत नाही. इतकेच नाही तर आपल्या शरीराची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या महिला प्राण्यांची चरबी आणि
हेमॅटाइट (लोखंडासारखे खनिज घटक) धुळीपासून एक विशेष प्रकारचे लोशन बनवतात आणि वापरतात. हेमेटाइटमुळे त्यांच्या शरीराचा रंग लाल होतो. या महिलांना लाल महिला देखील म्हणतात.