Ajab Gajab News : अनेकदा तुम्ही सापाच्या (Snake) गोष्टी ऐकल्या असतील. काही वेळा साप माणसांना चावलेला देखील तुम्ही पहिले असेल. पण तुम्ही पहिल्यांदाच एका सापाने एका व्यक्तीचे साडेसात कोटींचे नुकसान (Loss of Rs 7.5 Crores) केलेले ऐकत असाल.
माणसाचे नशीब कधी वळेल हे सांगता येत नाही. माणसाला श्रीमंत व्हायला खूप वेळ लागतो, पण बरबाद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. असेच काहीसे अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घडले आहे.

स्वत: च्या हातांनी घर जाळले
अमेरिकेतील (America) मेरीलँडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने सापाच्या प्रसंगातून आपल्या हाताने आपल्या घराला आग लावली.वास्तविक, गेल्या महिन्यात या व्यक्तीच्या घरात एक साप फिरताना दिसला होता.
यानंतर ती व्यक्ती त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्या व्यक्तीने सापाला मारण्यासाठी घेतलेल्या मार्गाने त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले.
वास्तविक, या व्यक्तीने विषारी सापाला मारण्यासाठी घरातील चुलीतील जळणारा कोळसा सापावर फेकून दिला. कोळशामुळे सापाला इजा झाली नाही, मात्र त्या व्यक्तीचे संपूर्ण घर जळून राख झाले. ही घटना 23 नोव्हेंबरची आहे.
साडेसात कोटींचे नुकसान
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, रात्री 10 वाजता त्या व्यक्तीच्या घरात आग लागली. यानंतर तातडीने 75 अग्निशमन दलाची (Fire brigade) गाडी पाचारण करण्यात आली. मात्र, बरेच प्रयत्न करूनही सर्व काही जळून राख झाले.
त्या व्यक्तीला जळत्या कोळशाने सापाला मारायचे असताना त्या कोळशामुळे त्याचे साडेसात कोटींचे घर जळून खाक झाले. या आगीमुळे व्यक्तीचे सुमारे साडे सात कोटींचे नुकसान झाले असून बंगल्यातील बहुतांश भाग जळून खाक झाला आहे.
या घटनेत त्या व्यक्तीला खूप त्रास झाला, मात्र सापाचे काय झाले, हे कळले नाही. रिपोर्टनुसार, कोळसा फेकल्यानंतर घराच्या तळघरात आग लागली होती.
काही वेळातच आग घरभर पसरली. जळत्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये घरातून ज्वाला निघताना दिसत आहेत.