Ajit Pawar : अजित पवारांनी भर सभेत जोडले हात; म्हणाले ‘आणा रे तो माझा बुके’…

Content Team
Published:

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बारामती मतदारसंघातील आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक अनोखाच प्रतुत सर्वासमोर आला आहे. अजित पवार ऐनवेळी त्यांच्या कामाच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असतात.

मात्र यावेळी अजित पवार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अजित पवार यांची इंदापूर येथील वरकुटे खुर्द (Varkute Khurd) येथे सभा होती. यावेळी अजित पवार सभेत कार्यकर्त्यांना संबोधीत करत होते.

यावेळी अजित पवार यांना समजले की कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे. त्यानंतर अजित पवार यांनी वेगळ्याच पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अजित पवार हे भलतेच चर्चेत आले आहे.

इंदापूरचे (Indapur) माजी आमदार स्वर्गीय गणपतराव पाटील यांचा उल्लेख करत त्यांचे पुत्र ज्येष्ठ नेते प्रतापराव पाटील (Prataprav Patil)  यांचा खरतर आज वाढदिवस आहे असे म्हणत मला ही बाब माहिती नव्हती.

माझी बहिण खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मला हे सांगितले असे म्हणत आणा रे तो माझा बुके ,आणा म्हणजे माझ्या स्वागतला मला दिलेला बुके आणा असेल म्हणत सभा थांबवुन बुके देऊन प्रतापराव पाटील यांना अजित पवारांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आज आणखी कुणाचा वाढदिवस असेल त्यांनाही हात जोडून अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या ज्यांचा कोणाचा आज वाढदिवस असेल त्यांना देखील शुभेच्छा नाहीतर म्हणतील हा बाबा फक्त त्यांना शुभेच्छा देतो,

असं काही नाही मला माहिती नव्हतं ज्यांचा ज्यांचा आज वाढदिवस (Birthday) असेल त्यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा पद्धतीने भर सभेत अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार अनेकदा त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. अजित पवार यांची काम करण्याची शैली इतर आमदारापेक्षा वेगळी आहे. भल्या पहाटे अजित पवार विकास कामे पाहणी करण्यासाठी कोणत्याही ठिकाणी पोहोचतात हे तर अख्या महाराष्ट्राने पहिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe