विरोधीपक्ष नेतेपदी अजित पवार, अखेर अदलाबदल झालीच

Published on -

Maharashtra news:विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने तसे पत्र दिल्यानंतर नियुक्तीची झाली घोषणा. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार विरोधीपक्ष नेते झाल्याने दोघांमधील पदांच्या आदलाबदलीची चर्चा आहे.

पवार यांनी कालपासून विधानसभेत दोन वेळा भाषण करुन शिंदे सरकारला कसे कोंडित पकडू शकतात, याचा ट्रेलर दाखवून दिला. शिवाय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर बहुमत झाले होते. त्यांना विधिमंडळ आणि प्रशासनातील कामाचाही मोठा अनुभव आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यात नावावर शिक्कामोर्तब केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News