मुंबई: देशात विविध टप्प्यात मतदान होतय. मोठ मोठ्या सेलिब्रिटी मतदानाचं आवाहन करत आहेत. मात्र अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट हे तिघेही भारतात मतदान करु शकणार नाहीत. कारण ते भारतीय नागरिक नाहीत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना ? पण हे खरं आहे.
हे तिघेही आतापर्यंत आपल्याला देशभक्तीचं गुणगाण करताना दिसले. मग ते त्यांच्या सिनेमातून असो की त्यांच्या चित्रपटातून असो. मात्र या तिघांबाबत एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. कारण हे तिघेही भारतात मतदान करू शकत नाहीत. कारण या तिघांकडेही भारतीय पारपत्र नाही. म्हणजेच या तिघांकडेही भारताचे नागरिकत्व नाही.

आतापर्यंत खिलाडी अक्षय कुमारने बऱ्याच सिनेमामांमध्ये देशभक्तीपर भूमिका साकारल्या आहेत. पण अक्षय कुमार भारतात मतदान करु शकत नाही. कारण अक्षय कुमारकडे कॅनेडियन पासपोर्ट आहे. म्हणजेच त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. कॅनडाने त्याला मानद नागरिकत्व दिलं.
भारत सरकार 2 नागरिकत्वाची परवानगी देत नाही. त्यामुळे अक्षयने भारताचं नागरिकत्व सोडलं. अक्षयचा जन्म पंजाबमधील अमृतसरमध्ये झाला. तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला. मार्शल आर्ट्स बँकॉकमध्ये शिकला.
या देशाने अक्षय कुमारला प्रेम दिलं, राष्ट्रीय पुरस्कार दिलेत, पैसा, प्रसिध्दी सगळं काही दिलं. तो सुध्दा अनेकदा देशभक्तीची भाषा करत आपल्याला मोहिनी घालत राहिला.
अक्षय देशासाठी, सैनिकांसाठी जरी आर्जव करत असला तरी त्याने भारतीयत्व का नाही स्वीकारलं, हा प्रश्न पडतो. त्याचसोबत दीपिका पादुकोण. तिच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही. तिच्याकडेही परदेशी पासपोर्ट असल्याची बाब पुढे आली.
दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगनमध्ये झाला. दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. तिला डेन्मार्कचं नागरिकत्व मिळालं.तर अभिनेत्री आलिया भटकडेही भारताचा पासपोर्ट नाही. आलिया भट ब्रिटीश नागरिक आहे. आई सोनी रझदानही ब्रिटीश नागरिक आहे.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी